भरधाव ॲपेने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाघोदा गावातील 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चिनावल-वाघोदादरम्यान रात्रीच्या सुमारास घडला. राहुल कालू गट्टे (भिल)(27, वाघोदा बु. ता. रावेर) असे मयताचे नाव आहे.[ads id="ads1"]
सावदा पोलिसात गुन्ह्याची नोंद
तक्रारदार शिवचरण उर्फ शिवा शिवराम कटझिरे (वाघोदा बु. ता. रावेर, मूळ रा. गांधवा, जि. खंडवा) हे ट्रिपल सीट दुचाकीने येत असताना समोरून आलेल्या ॲपे (एम.एच.19 व्ही.9737) ने खड्डा चुकवण्याच्या नादात धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिवचरण, कपिल भिल तसेच राहुल भिल हे जखमी झाले. [ads id="ads2"]
राहुल याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी शिवचरण भिल यांच्या फिर्यादीनुसार ॲपे चालकाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.


