रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
केंद्र सरकारच्या दमन कारी वृत्तीचा व ईडीचा निवेदनाद्वारे तिव्र निषेध करण्यात आला. नायब तहसिलदार संजय तायडे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ,पत्राचाळीचा मुद्दा हा किती निगडीत आहे हा संशोधनाचा विषय आहे आणि घरात मिळून आलेली रक्कम ही मुख्यमंत्री साहेबांनीच पुर्वि पक्ष कार्यासाठी दिली असल्याचे समजते.[ads id="ads1"]
खरेतर अडीच वर्षापूर्वि भाजपला डावलून सरकार बनवले हेच खरे दुखने आहे . भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडी,सिबीया सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रादेशीक विरोधी पक्षाच्या सरकारांची सत्ता मिळवण्यासाठी गैरवापर करीत आहे. देशभरात भाजपाचेच वातावरण आहे असा भास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात अर्ध्या देशात विरोधी पक्षांचे सरकार आहे हेच त्यांना पाहवत नाहीये . या मुळे केंद्र सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या पवित्र घटनेची पायमल्ली करीत आहे .[ads id="ads2"]
साम,दाम, दंडभेदाने भाजपची सरकारे बनवायची हा अघुरी प्रकार करीत आहेत. सत्तेत असलेल्या भाजप व भाजपत आलेल्या नेत्यांवर ईडीची कार्यवाही का नाही ? यातून प्रांतीय विरोधी सरकारे मोडीस काढायची या
केंद्र सरकारच्या प्रवृत्तीचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावरती जिल्हाउप प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील, तालुका संघटक अशोक शिंदे, तालुका युवाधिकारी प्रवीण पंडीत, शहर अध्यक्ष नितिन पाटील, राकेरा घोरपडे , संतोष पाटील, निलेश महाजन, निलेश दलपत महाजन , पिंटुमाळी, निलेष सुभाष पाटील व ईतर शिवसैनिकांच्या सह्या आहेत.


