रावेर तालुक्यातील विवरे बु (Vivare Bk Taluka Raver) येथे ग्रामपंचायतिने दि 30 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते परंतु विवरे बु गावातील नागरिकांनी उपस्थिती न दिल्या मुळे कोरम अभावी ग्रामसभा तहकुब करण्यात आली.[ads id="ads1"]
गावाचा रखडलेला विकास व ग्रामपंचायत विवरे बु चा मनमानी कारभार याला कंटाळून नागरिकांनी ग्रामसभेवर बहिष्कार घातल्या चे ग्रामस्तांचे म्हणणे आहे गावातून नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत ला कामांबाबत लेखी व तोंडी सूचना दिल्यावर सुद्धा ग्रामपंचायत काम करीत नाही वेळो वेळी वसुली चे कारण पुढे करून नागरिकांना उडवा उडावी ची उत्तरे दिली जातात.[ads id="ads2"]
लोकांनी विश्वास ठेऊन निवडून दिलेले लोक फक्त स्वतःची पोळी भाजतांना दिसत आहे व हा मोठा की मी मोठा या स्वार्थी राजकानामध्ये हे लोक गावाच नुकसान करीत आहे गावातील सरपंच हे स्वतंत्र निवडून येऊन सुद्धा ते स्वातंत्र का निर्णय घेऊ शकत नाही? व लोकांची काम का ते मार्गी लावत नाही? त्यांना सरपंच होण्यासाठी ग्रामपंचायत च्या कोणत्याही सदस्यांनी त्यांना मतदान केले नाही सरपंच हे स्वतः अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून राखीव जागेतून ते सरपंच झालेले आहेत तरीही सरपंच गावाच्या विकासा बदल स्वातंत्र निर्णय घेत नाही याची ग्रामस्थांना खन्त वाटत आहे असे विवरे बु गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
तहाकूब सभेला यांची होती उपस्थिती
सरपंच युनूस तडवी, ग्रामसेवक डीगंबर जावळे, सदस्य ललिता पाचपांडे, नवशदबी, पूनम बोडे, नीलिमा संनसे, ज्योती सकपाळ, वासुदेव नरवाडे, दिपक राणे, विपीन राणे, भाग्यश्री पाटील विनोद मोरे,लिपिक सुरज नरवाडे, राहुल परस्कार शिपाई गुलाब भंगाळे यांची तहकुब सभेला उपस्थिती होती गावातील ग्रामस्थांमध्ये गावाच्या ग्रामपंचायत च्या कमांबद्दल नाराजी चा सुर निघत आहे.


