प्रहार संघटनेचे शेतकरी जिल्हा प्रमुख सुरेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुनखेड़ा येथील रखडलेला रस्त्याला पुन:जिवन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधि-विनोद कोळी 

    प्रहार संघटनेचे प्रहार संघटने चे शेतकरी जिल्हा प्रमुख सुरेश दादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुनखेड़ा येथील रखडलेला रस्त्याला पुनर जिवन माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या विचाराने प्रेरित तसेच प्रहार संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षते खाली श्री शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमूख श्री सुरेश दादा पाटिल यांनी जनहितासाठी आपले छान कर्तव्य पार पाडले.[ads id="ads1"] 

  त्यांनी पुनखेड़ा येथील  बंद पडलेला भोकर नदीवरील पूल त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने पुलाचे काम वेळेवर पुर्ण केले. परंतु अजूनही आमच्या रावेर तालुक्यातील पूर्व भागावर आमदार ,खासदार व सामाजिक कार्यकर्ते अन्याय करत आहे. पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुलावर काम चालू आहे. जुन महिन्यात नदीला पाणी आल्यामुळे तालुक्यातील पुर्व भागाचा रावेरशी संपर्क तुटला.[ads id="ads2"] 

  3 महिन्यापासून या परिसरातील लोक आमदार खासदार व इतर पक्षाचे कार्यकर्ते यांना भेटुन समस्या मांडल्या कि शालेय विद्यार्थी व गोर गरिबांना 20 km फेऱ्याने जावं लागत होत .हि समस्या सांगुनही लोकप्रतिनिधींनी मदत न केल्यामुळे जनतेने सुरेश चिंधु पाटील यांना कळवलं . आज जनतेसाठी सुरेश चिंधु पाटील यांनी स्वखर्चाने रस्ता करून समस्या सोडवली शेतकरी वर्गाला याचा खुप फायदा झाला.वर्गाचा केळिचा खाली ट्रक जात नव्हता,आता तोच केळिचा 50 टनी ट्राला केळिचा भरलेला सहज पुनखेड़ा नदीच्या पुलावरुन जात आहे.मा.सुरेश चिंधु पाटील तसेच शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत जाण्या येण्यासाठी खुप अडचण निर्माण होत होती,आता विद्यार्थी यांची सुद्धा अडचण सुटली आहे.प्रहार संघटनेच्या सुरेश दादा पाटिल यांनी छान कर्तव्य बजावल्यमूळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्या ठिकाणी उपस्थीत प्रहार संघटने जिल्हा प्रमूख,राजु महाजन. शेतकरी जिल्हा प्रमूख सुरेश चिंधू पाटिल.युवा जिल्हा प्रमूख,अविनाश पाटिल.तालुका प्रमूख,पिंटु धांडे. उपजिल्हा प्रमूख गणेश बोरसे.तसेच युवा ता,प्रमुख,योगेश निकम.अल्पसंख्यांक तालुक प्रमूख,वसीम ठेकेदार.आणि प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!