रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील नारायण पुंडलिक पाटील यांच्या विरोधात फिर्यादी कैलास राजाराम पाटील,पातोंडी ता रावेर यांनी उसनवारी पैसे दिल्याप्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला नंबर 622/2017 अशी negotiable instruments act 1881 कलम 138 अन्वये फौजदारी गुन्हा नोंदविला होता.[ads id="ads2"]
सदर गुन्ह्यांची संपूर्ण चौकशी होऊन न्यायालयाने आरोपी नारायण पुंडलिक पाटील यांस सबळ पुराव्याअभावी दि.22/8/2022 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपी तर्फे जे.जी.पाटील मोरगावकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली होती.यामुळे चेक बाॅऊन्स प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


