रावेर प्रतिनिधी (राजेद्र अटकाळे)
रावेर दि.15/8/2022 रोजी श्री शिवप्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या तीन दिवसीय कार्यक्रमात दिनांक 13 ऑगस्ट रोजी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. [ads id="ads1"]
दिनांक 14 ऑगस्ट रोजी गावातील माजी सैनिक मा.श्री सुनील साखळकर यांच्या शुभहस्ते,व दिनांक 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री दिलीप कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच भारतमाता,छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमापूजन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री दिलीप शेठ अग्रवाल, सहचिटणीस श्री अशोक शिंदे, ज्येष्ठ सदस्य डॉ. श्री एस.आर.पाटील, श्री प्रदीप मिसर सर, श्री हर्षल अग्रवाल,श्री राजेश अग्रवाल,श्री नितीन पाटील, श्री विनय रावेरकर, श्री बाळू शिरतुरे उपस्थित पालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर, श्री मोहन बारी सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. [ads id="ads2"]
तदनंतर विद्यार्थ्यांनी संस्कृत,मराठी इंग्रजी, हिंदी या चारही भाषेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विषयी अतिशय महत्त्वपूर्ण भाषने दिली.त्यानंतर देशभक्तीपर समूह नृत्य सादर करण्यात आले. तदनंतर स्वातंत्र्य संग्रामात आपले सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व शहीद,क्रांतिकारक,देशभक्त यांच्या सन्मानार्थ सर्वांनी स्यालूट करून मानवंदना दिली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत कवायत संचालन केले. याप्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पालक वर्गाने सुद्धा बहुसंख्य संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक श्री विकास पाटील सर यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन पाठक सर यांनी केले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सरस्वती शिशु मंदिर व सरस्वती विद्या मंदिरातील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


