भुसावळ( प्रतिनिधी) कवियीत्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि. जळगाव विद्यार्थी विकास विभाग व भुसावळ कला, विज्ञान आणि पु ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. २८ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १०० वाजता वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे बेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयावर आपली वकृत्व कला सादर केली.प्रशिक तायडे या डी.एन.भोळे महाविद्यालयाच्या सर्धकाने " सोशल मीडियाच्या विळख्यात आजची तरुणाई " या विषयावर आपली कला सादर करीत तृतीय क्रमांक पटकावला.त्यास रोख बक्षीस पंधराशे पंच्याहत्तर आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. [ads id="ads2"]
सदर कार्यक्रम पु. ओ.नाहटा महाविद्यालयात पार पडला. प्रशिक तायडे याने मिळवलेल्या यशा बद्दल डी.एन भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. फालक,प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. सदर स्पर्धेकामी महाविद्यालयाचे प्राध्यापक दयाघन राणे व संजय बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.


