ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता.रावेर येथे समस्त नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक भाऊ पाटील मा.पं.स. सदस्य हे होते प्रथम दिपक पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads1"]
नंतर संत सेना महाराज यांच्या जिवन कार्यावर पत्रकार विजय एस अवसरमल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मा.पं.स. सदस्य दिपक भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन, निंभोरा येथील सरपंच सचिन महाले, किशोर पाटील ग्रा.प.सदस्य,मा.ग्रा.पं.सदस्य कैलास पाटील,विलास अवसरमल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस अरविंद महाजन, भारतीय जनता पक्षाचे शुभम पाटील,मोहन कचरे नाभिक समाजाचे जेष्ठ रमेश मावळे,सोनु मावळे, वसंत मावळे हे उपस्थित होते.[ads id="ads2"]
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाजाचे अध्यक्ष कल्पेश मावळे उपाध्यक्ष प्रदीप मावळे, अनिल मावळे, राहुल सनांसे,प्रकाश मोरीस, प्रेमचंद सोनवणे, मुरलीधर मावळे, गंगाधर मावळे,हरलाल सोनवणे, प्रविण शिवरामे, प्रमोद मावळे, संजय मावळे, संदिप मावळे,जगन मावळे,शंकर शिवरामे,पिंटू मोरीस गौरव मावळे,सुधाकर सोनवणे,चेतन मावळे,शुभम मावळे,तेजस शिवरामे, पंकज मावळे,उमेश सोनवणे,अक्षय मावळे,स्वप्निल मावळे,यश मावळे,निहार मावळे यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग मावळे यांनी केले तर आभार नाभिक समाजाच्या वतीने कल्पेश सोनवणे यांनी मानले.


