मुक्ताईनगर येथील बस स्टँड,जे ई स्कुल ,खडसे महाविद्यालय आणि संत मुक्ताई महाविद्यालयाच्या मार्गावर रोड रोमियोंनी उच्छाद मांडला असून त्यामुळे शहरातील व बाहेर गावातुन येणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडखाणीच्या घटना वाढल्या असून त्यामुळे महिला व विद्यार्थींनीमध्ये भीतीचे वातावरण पसरत असल्याने महिला आघाडी आक्रमक झाली असून नाहक त्रास देणाऱ्या रोड रोमियोंच्या बंदोबस्तासाठी शिवसेना महिला आघाडी कडून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.[ads id="ads2"]
आणि या निवेदनात पोलिसांकडून महिला व विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर शिवसेना महिला आघाडीच्या संघटक: सुनीता कोळी,शोभा कोळी,सुनीता तळेले, शारदा भोई, ज्योती मालचे,भावना गायकवाड,मंगला धनगर आणि दीपाली कोळी या महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


