“एक कुटुंब,दोन वृक्ष" या संकल्पनेंर्गत जय बाबाजी भक्त परिवारा कडुन यावल तालुक्यात वृक्षारोपण संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल दि.22(सुरेश पाटील)श्री क्षेत्र वेरुळ ता.रत्नपुर जि.संभाजी नगर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी(मौनगिरीजी)महाराज यांच्या108 व्या जन्मोत्सवा निमीत्त व आपल्या भारत देश स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त जय बाबाजी भक्त परिवार व जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख मार्गदर्शनाने 1तासात 5लाख वृक्षरोपणाचा संकल्प करण्यात आला होता.त्या माध्यमातुन “एक कुटुंब दोन वृक्ष" या संकल्पने अंतर्गत व “महाश्रमदान " उपक्रमांतर्गत आज चौथ्या श्रावणी सोमवार दि.22 ऑगस्ट 2022रोजी हि वृक्षारोपणाची मोहिम राबण्यिात आली[ads id="ads1"] .

नागरीकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.यात यावल तालुक्यातील भक्त परिवारा तर्फे सकाळी 8 ते 9 या 1तासाच्या वेळेत एकाच वेळी हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यात प्रामुख्याने तुळस,फुल झाडे,फळझाडे,आंबा,बेल इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.[ads id="ads2"] 

सदरील वृक्षारोपण मोहिम यशस्वीतेसाठी तालुक्यातील यावल,सौखेडासिम,दहिगांव,विरावली,सांगवी खुर्द,चितोडा, भालोद,फैजपुर आदीसह पंचक्रोशितील सर्व जय बाबाजी भक्त परिवाराने परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!