उन्हाळ्यात अतिशय उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत खोलवर जाते, परिणाम केळी पिकाला पाणी कमी पुरवठा होतो, त्यात विजेची टंचाई, उष्ण गरम वारे, त्यामुळे केळी बागा सुकतात, थंडीत केळीबांगावर करपा लवकरच येतो, त्यात मोठ्या प्रमाणात केळी बागायतीचे नुकसान होते, त्यात आजपर्यंत केळीला मोफत करपा निर्मुलनासाठी औषधींचा पुरवठा केंद्र, राज्य सरकारने बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.[ads id="ads2"]
पावसाळ्यात आस्मानी सुलतानी, पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा बसतो यामुळे लाखोंच्या केळीबागा जमीन दोस्त होतात, हजारों हेक्टर क्षेत्रातील केळी कोलमडून पडते, शेतकरी बिचारा तोही घाव आपल्या घरातील कर्ता गेला म्हणून संसार सोडून द्यायचा नसतोच म्हणून पुन्हा नव्याने उमेदीने रक्ताचे पाणी करून केळी पिकांचे संगोपनासाठी दिवस रात्र कठोरपणे परिश्रम करतो, त्यात सिंगाटोका, केळीला पककन, अशा असंख्य अडचणींवर मात करून अखेर सी एम व्ही केळी रोगांसमोर घुडगे टेकतो,
केळीला लागवड पिंकाला खूप मोठा उज्ज्वल इतिहास आहे पण केळी पिकावरील किड,रोग नियंत्रण,सी एम व्ही रोगांवर अजून पर्यंत यासाठी परफेक्ट संशोधन केले जात नाही हि सर्वात मोठी शोकांतिका आहे,कारण केळी रोपे पुरवठादार कंपन्यांचे पेव्ह फुटले आहे पण एकही केळी संशोधन,किड,रोग नियंत्रण सी एम व्ही रोगांवर रामबाण उपाय तंत्रज्ञान विकसित केले जात आहेत, का केळी रोपे पुरवठादार कंपन्या, केंद्र,राज्य सरकार यासाठी आग्रही भूमिका घेताना दिसत नाही.
शेतकरी दिवसाढवळ्या कर्जाच्या खाईत लोटला जातो, तोच उध्दवस्त होत आहे, बळीराजाला,केळी बागायतीदार ,केळी उत्पादक शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ही न्यायव्यवस्था, राज्यकर्ते घेऊन जात आहेत,या संवेदनशील केळी पिकावरील प्रश्नांवर तोडगा कधी काढला जाईल, याबाबत केळी उत्पादकांच्या मनात संभ्रम आहे. यामुळे एक वेळ केळी पिक नामशेष होऊन शेतकऱ्यांची दुर्दशा नक्कीच होईल. म्हणून आता तरी राज्यकर्ते यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अशी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे यांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


