Yawal : मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीचा सोमवारी श्राध्द सोहळा ; हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेणार..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) हजारो भाविकांचे,भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या यांच्या श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. [ads id="ads1"] 

      सोमवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबार सकाळी सात वाजता आरती,आठ वाजता सेवा,दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी बारा वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री आठ वाजता महाआरती व रात्रभर ठिक- ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे.[ads id="ads2"] 

     मनवेल ग्रामपंचायत मार्फत व गावकरी आपआपल्या भागात स्वच्छता मोहीम राबवून गावात रागोंळ्यानी व धुनीवाले दादाजी यांच्या ध्वज ठिक ठिकाणी लावण्यात आले असून गाव भगवामय झाले आहे.

या सोहळया करीता महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील धुनीवाले दादाजी भक्तगण,अधिकारी,विविध राजकीय पदाधिकारी,लोकप्रतीनिधी या कार्यक्रम करीता आवर्जून भेट देऊन महाप्रसादच्या आस्वाद घेत असतात श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी १९३९ या वर्षी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली त्या दिवसा पासून मनवेल गावी श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

वरण पोळी व गंगाफळची भाजी असा स्वादिष्ट महाप्रसादच्या मेनु आहे.गंगाफळची भाजी प्रसिद्ध असुन कार्यक्रमात आलेले भावीक भाजी प्रसाद म्हणून घरी नेतात व आवडीने खातात.याठिकाणी दिवसभर भावीकांसाठी साकळी या गावात बापु धोबी या दादा भक्त गणासाठी मोफत शिरा वाटप करतात तर महर्षि वाल्मीक मित्र मंडळ मनवेल यांचा मार्फत पोहे वाटप तर चहा वाटप व रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येत असुन साकळी - मनवेल दरम्यान मोफत प्रवास करीता वाहन व्यवस्था करण्यात येत असते.या कार्यक्रमासाठी साकळी,शिरसाड,थोरगव्हाण, पथराडे,शिरागड,पिळोदा खुर्द, दगडी या गावातील भावीकांचे सहकार्य लाभते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!