जळगांव बस आगाराची (MH ४० M ९८३४) रावेरकडून जळगाव च्या दिशेने निघाली होती. दुपारच्या सुमारास सव्वा तीन वाजता रावेर सोडल्यावर अगदी १० मिनिटाच्या अंतरावर जाऊन समोरून विवरे गावाकडून रावेरकडे येत असलेला कंटेनर चालक ओव्हरटेक करत असतांना,बसच्या दिशेने जोरात आल्यावर बसचालकाने प्रसंगवधान राखत,बस विरुद्ध दिशेने थेट मक्याच्या शेतात घातल्याने,बसमध्ये असलेल्या २० प्रवाश्यांचे जीव थोडक्यात बचावले आहे.आणि मोठा अनर्थ टळला आहे.[ads id="ads2"]
यामध्ये चालक बी बी कोळी व प्रवाशी पिंटू बारेला (वय २६),अंजली पिंटू बारेला (वय २०),कार्तिक पिंटू बारेला वय-३ वर्षे हे जखमी झाले आहे. असून सर्व जखमींना तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करून सोडण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आगार प्रमुख निलेश बेंडकुळे,सहा.वाहतूक अधीक्षक संदीप तायडे,वाहतूक निरीक्षक योगेश जोशी हे कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले.त्यांनी प्रवाश्यांना मदत केली.यातील जखमी वगळून अन्य प्रवाश्यांना इतर बसेस मधून पुढील प्रवासासाठी रवाना केले.
याबाबत बसचालक (ST Driver) कोळी यांनी रावेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर (क्र.डीडी एम ९४३२) चालक शहादत कलमखान रा.दिलदारनगर तहसील जमनिया जि.गाझीपूर उ.प्र.याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. परिवहन मंडळाकडून जखमी प्रवाश्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात आली आहे.या बाबत तपास पो.कॉन्स्टेबल अतुल तडवी करत आहे.


