रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी प्रहार दिव्यांग संघटनाचे दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी रावेर येथील तहसिल कार्यालय मधे,नायब तहसीलदार,संजय तायडे.व पुरवठा अधिकारी डी. के. पाटील यांची भेट घेतली.[ads id="ads1"]
प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका तर्फे 5 सप्टेंबर महिन्यात अंत्योदय कार्ड योजना संदर्भात निवेदन देण्यात आले होते.आज रोजी 1 महीना पुर्ण झाल्यावर परत प्रहार दिव्यांग संघटनेने तहसिल कार्यालय गाठले असता,[ads id="ads2"]
पुरवठा अधिकारी यांनी दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांना अंत्योदय योजनेचे परिपत्रक ताब्यात दिले.तसेच पुढील महिन्या पर्यंत सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्ड वितरित करण्यात येईल असे आश्वासन दिले.तरी रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांन मधे आनंदाची बातमी पसरली आहे.यावेळी प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष.विनोद कोळी तसेच प्रहार कार्यकर्ते विश्वनाथ भिल्ल, संजय मावळे.इत्यादीची उपस्थीती होती.


