ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
महाराष्ट्रातील जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाने १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला असून दिवाळीच्या पुर्वी वाटप करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले परंतु काही ठिकाणी माल उपलब्ध झाला नाही.[ads id="ads1"]
ऐनपुर येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत असून या आनंदाच्या शिध्यात चणाडाळ,रवा,व तेल दिले साखर मात्र गायब आहे गरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून १०० रुपयांत एक किलो चणाडाळ एक किलो साखर,एक किलो रवा,व एक लिटर तेल असे किट सर्वत्र धान्य दुकानातून वाटत करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
येथे मात्र गरीबांचा गोडवाच म्हणजे साखर गायब झाली आहे साखरच मिळाली नाही तर शिरा कसा होणार ? त्यामुळे आनंदाच्या शिध्यातील गोडवाच हिरावून घेतला आहे.
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
आनंदाच्या शिध्यात शासनाकडून चार किलो अन्नाच्या वाटपाचे आश्वासन असतांनाच पुर्ण किट न देता कुठे दोन किलो तर कुठे तीन किलोचे किट उपलब्ध होत असल्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या अपुर्ण आनंदाच्या शिध्यामुळे दिवाळीतील गोडवाच हिरावल्यासारखा झाला आहे.


