रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहरातील लोकांचा धडकला मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

 रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही,गटारी नाही व स्ट्रीट लाईट नाही. असे असले तरी नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपट्टीचे अव्वचेसव्वा बिले पाठवून कर आकारणी करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

   त्याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.परंतु आता पर्यंतचा पालिकेचा अनुभव पाहता हरकतींचा निव्वळ फार्स असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच बऱ्याच नागरिकांच्या घरांचे पत्ते व वर्णन चुकीचे नमूद केल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबद्दल काही नागरिकांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री. पद्माकरभाऊ महाजन यांच्या सोबत चर्चा करून याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली असता त्यांनी तात्काळ दखल घेऊन पद्माकर महाजन यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने नगरपालिका कार्यलयात धडक मोर्चा नेत आधी नागरिकांना सुविधा द्या मग कराची मागणी करा.[ads id="ads2"] 

   व लवकरात लवकर केलेली अव्वाचेसव्वा करवाढ रद्द करा. हा अन्याय सहन केला जाणार नाही. अन्यथा यापुढे हजारोंच्या संख्येने नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक श्री.तडवी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

शहर अध्यक्ष श्री दिलीप पाटील. तालुका सरचिटणीस श्री सी. एस. पाटील.उपाध्यक्ष श्री अरुण भाऊ शिंदे. नगरसेवक श्री राजेंद्र महाजन. नगरसेवक श्री सुधीर पाटील. नगरसेवक श्री यशवंत दलाल.नगरसेवक योगेश गजरे,माजी अध्यक्ष श्री मनोज श्रावक. प्रसिद्धीप्रमुख श्री नितीन पाटील. उपाध्यक्ष श्री अमोल पाटील. शहर सरचिटणीस रवींद्र पाटील. श्री हिलाल दादा सोनवणे दिव्यांग आघाडीचे प्रमुख श्री संजय महाराज श्री रजनीकांत बारी प्रा. श्री ई. जे. महाजन सर सामाजिक कार्यकर्ते श्री रविंद्र महाजन. श्री राकेश गडे अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद भाई. उपाध्यक्ष श्री भूषण महाजन.ॲड.प्रवीण पासपोहे,युवा मोर्चा पवन बोदडे.कार्यकर्ते अब्दुल रफिक अब्दुल अजीज. शेख मंजूर शेख कादर. शेख कौसर शेख अजगर. शेख ग्यात शेख रशीद. शेख युसुफ शेख इब्राहिम.शेख मद्दरसअली शब्बीर अली शेख गयास उद्दीन काजी शेख रफिक शेख सत्तार, गणेश मराठे,धोंडू पासे,नामदेव महाजन,बाळा आमोदकर,धृव पाटील वगैरेमोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!