यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यात यावा या दृष्टिकोनातून या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावल पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.[ads id="ads1"]
किमान वेतन कायदा अंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावे वयक्तिक खात्यात मानधन जमा करावे ग्राम रोजगार सेवकाला विना आरक्षण प्रदान करण्यात यावे ग्राम रोजगार सेवकांचे प्रलंबित देयके त्वरित देण्यात यावे यासारख्या अनेक मागणी असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आले.[ads id="ads2"]
पंचायत समिती यावल तालुका जिल्हा जळगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करताना ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक खुशाल पाटील यावल तालुका अध्यक्ष दीपक कोळी उपाध्यक्ष अनिल अडकमोल वसीम पिंजारी सचिव सरफराज तडवी सहसचिव फकीरा तडवी, अनिल ढाके व सर्व ग्राम रोजगार सेवक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन