मुन्नादेवी मंगलादेवी फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार तर्फे दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर, फराळ, मिठाई, कपडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

मुन्नादेवी मंगलादेवी फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार तर्फे दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर, फराळ, मिठाई, कपडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम संपन्न

गरजवंतांच्या हास्याने सजली मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनची दिवाळी

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव - येथे दिनांक २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी मुन्नादेवी मंगलादेवी फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार तर्फे दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर, फराळ, मिठाई, कपडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads1"] 

शहरातील प्रमुख व्यापारी आणि समाजसेवक जीवनसिंह बयस तसेच मुकेशसिंह बयस यांच्या अथक प्रयासाने मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाउंडेशन हि संस्था अनेक खडतर अडचणींचा सामना करून धरणगाव परिसरात भरीव समाजकार्य करत असते. एरव्ही अवघ्या तीस रुपयात परिपूर्ण जेवणाचे ताट उपलब्ध करून देणाऱ्या आणि गावातील गरजू लोकांना दररोज खिचडी वाटप करणारी हि संस्था, आपल्या अन्य उपक्रमांमार्फत आदिवासी, अनुसूचित जाती जमाती तसेच समाजातील अभावग्रस्त लोकांसाठी संपूर्ण उर्जेने काम करत असते.[ads id="ads2"] 

शालेय साहित्यवाटप, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थांचा शिक्षणाचा खर्च उचलणे यासह कोरोना काळातही आपल्या अथक परिश्रमाने थोड्याच अवधीत या संस्थेने परिसरात आपल्या कीर्तीचा लौकीक पसरवला आहे.

या दिवाळीच्या निमित्ताने पाच दिवसाच्या दीपोत्सवात गरजू लोकांच्या आयुष्यात प्रकाश पडावा, त्यांची घरे उजळवून टाकावीत तसेच ज्यांना फराळ आणि अन्य दिवाळीच्या गोष्टी परवडणे शक्य नाहीं अशांसाठी हा उपक्रम श्रीजी जिनिंगचे संचालक आदरणीय जीवनसिंह बयस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. जळगाव महाकॉटचे अध्यक्ष प्रदीप जैन, जळगाव येथील चंपालालशेठ सोनी, रतनशेठ जैन, धरणगाव नगरीचे माजी अध्यक्ष सुरेश चौधरी तसेच श्रीजी जिनिंगचे संचालक नयन शेठजी गुजराती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रीतम बयस, तसेच उपाध्यक्ष तेजेंद्र चंदेल, सदस्य निखिल बयस, कपीलसिंह चव्हाण, यशपाल चंदेल, महेंद्र बयस, विक्रांत बयस, लकी चंदेल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र परदेशी यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!