विशेष प्रतिनिधी - विनोद कोळी
मुख्यमंत्री सहायता निधीतून अवघ्या चार महिन्यांत 1062 रुग्णांना सहा कोटी चाळीस लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत, पोहोचवण्याचा संकल्प करा, असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. [ads id="ads1"]
मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या गुडघे बदल, खुबा बदल ,शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे .तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेमधून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जन्मतः कर्णबधिर मुलांच्या कांक्लिअर इमो प्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. [ads id="ads2"]
आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात हृदय, शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमरो, व हृदय प्रत्यारोपण, शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपये, पर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा व खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग ,कर्करोग, लहान बालकांचे आजार ,अपघातातील शस्त्रक्रिया, आदीसाठी एक लाख रुपयापर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्तिव्यंग, आदींसाठी पन्नास हजार रुपये, मदत मिळेल. याशिवाय अन्याजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे पंचवीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून, तंत्रज्ञानाचा वापर करीत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी( mahacmmrf.com) हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना येणाऱ्या अडचणी, सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.