योगेशजी सुतार यांना महात्मा जोतीराव फुले जीवन गौरव सन्मान प्रदान !.....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



🔹सुतार हे खान्देशातील पहिले जीवनगौरव प्राप्त झालेले चित्रकार !.....

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव जि.जळगाव या ग्रामीण भागातील २४ वर्षापासुन कलाशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच चित्र प्रदर्शन शैक्षणिक उपक्रम,कला विषयक मार्गदर्शन, कला व सांस्कृतिक शिबीर राबविली म्हणून हा सन्मान मिळाला आहे. [ads id="ads1"] 

           राज्यस्तरीय पुरस्कारासाठीे नामांकन युवा सेना-मविसेचे प्रदेशाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांनी केले. तपशिल ज्यूरी सदस्यांनी निवडुन पुरस्कार वितरण मिस युनिव्हर्सल मा.किटॅनो दत्ता ( लिडर आफ्रिका ) यांच्या हस्ते झाले. नाशिक येथे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार्थींना आफ्रिकन गॅब्रियल सिल्वा, आयोजक निलेश आंबेडकर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे[ads id="ads2"] 

              तरुणांना मार्गदर्शन उपलब्ध करणे तसेच पोलिस प्रशासनास आरोपींचे रेखाचित्र काढुन जनसामान्यांना न्याय मिळवुन देणे असे आदर्श काम करणारे योगेशजी सुतार यांचे निर्वाण फाॅऊडेशनच्या वतीने सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी इंडिया बुक मध्ये नोंदणी राज्य तसेच देशभरात अनेक चित्रप्रदर्शन व कला शैक्षणिक, सरकारी कार्यालयात चित्रस्मारकांची कामे केल्याची दखल घेत राज्यातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात सुतार यांचा समावेश झाला हे समस्त खान्देशासाठी अभिानास्पद आहे, यावेळी बोलताना म्हणाले की, हा सन्मान माझा नसून समाज परिवर्तनासाठी योगदान देणार्‍याला व माझ्या कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणार्‍या माझे आई वडील भाऊ व पत्नी तसेच माझ्यावर प्रेम करण्याऱ्या सर्व सहकारी मित्रांचा सन्मान आहे. हा सन्मान माझा नसून खान्देश वासियांचा आहे. आपला नेहमी ऋणी राहील.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!