मोठा वाघोदा गावातील पंतप्रधान ग्राम सडक मोजतेय अखेरची घटका खराब रस्त्यामुळे गावातील रस्त्यावर सुरू आहे अपघातांची मालिका
मोठा वाघोदा/मोहसिन तडवी
मोठा वाघोदा तालुका रावेर येथील मोठा वाघोदा ते सुकीनदी निंभोरा या ३ किमी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र सदर रस्त्यावर बीबीएम डा़बरी लेयर कछ डांबरी कोटींग या प्रमाणानुसार खडी साहित्य इस्टीमेट नुसार वापरले जात नसून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची तक्रार वाहन धारकांसह शेतकरी ग्रामस्थांना कडुन व्यक्त करण्यात येत आहे मात्र सावदा सार्वजनिक बांधकाम विभाग होत असलेल्या रस्त्याच्या कामापासून अज्ञभिन्न आहेत का ? जर नाही तर मग या निकृष्ट दर्जाचे कामाकडे दुर्लक्ष का केले जाते आहे?? [ads id="ads1"]
आर्थिक हितसंबंध तर जोपासले जात नाही ना??आणि काहीच नसेल तर अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या रस्त्याच्या कामाकडे सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष केंद्रित करावे व संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण उत्कृष्ट प्रतीचे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच मोठा वाघोदा गावातील पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या १किमी रस्ता अखेरची घटका मोजत आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि दरम्यानच्या रस्त्यावर मध्यभागी ७,८इंचाची फट पडलेली आहे.[ads id="ads2"]
तसेच रस्ता ओबडधोबड खालीवर खचलेला आहे या खचलेला रस्ता व खालीवर झालेल्या खड्ड्यांमुळे दैनंदिन अपघातांची मालिका सुरूच आहे ३ अपघात ग्रस्तांना प्राण ही गमवावे लागले आहे वारंवार सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांना वारंवार तक्रार करूनही सा बा.विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे तसेच सावदा सार्वजनिक बांधकाम विभाग याचेवर रावेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचा काही एक वचक राहिलेला नाही का?? यामुळे च सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी मस्तवाल झाल्याचे प्रत्यक्ष चित्र समोर दिसत आहे.
तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी या बाबतीत जातीने लक्ष द्यावे आणि मोठा वाघोदा निंभोरा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे तसेच मोठा वाघोदा गावातील रावेर रोडवरील निंभोरा पंतप्रधान ग्राम सडक रस्त्यावरील मधील ८इंची भेगा खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अन्यथा खड्डे न बुजविण्यास तसेच रस्त्यावर डांबरीकरणाचे उत्कृष्ट प्रतीचे न केल्यास सावदा सावर्जिनक बांधकाम विभाग कार्यालय येथे उपोषणाला बसणार असल्याचेही वाहन धारकांसह शेतकरी ग्रामस्थांतून बोलले जात आहे.