यावेळी मनमाड शहराध्यक्ष दिलीप नरवडे, कैलास अहिरे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे, नांदगाव शहराध्यक्ष महावीर नाना जाधव, गुरुकुमार निकाळे, रिपब्लिक ऑफ इंडियाचे महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, आधी सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमरण उपोषणास उपस्थित होते. या उपोषणाला काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे तसेच प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.[ads id="ads2"]
नांदगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तहसील कार्यालय कार्यक्षेत्रातील प्रलंबित सर्व कामे, विविध योजना या प्रलंबित कामाच्या संदर्भात तहसील कार्यालयात कामधंदा सोडून वारंवार चकरा माराव्या लागत आहे. लाभार्थ्यांना फुटबॉल पूर्वीचे उत्तरे देऊन माघारी पाठवले जाते. ऑनलाइन बंद आहे, सर्वर चालत नाही, अधिकारी मिटींगला गेलेली आहेत, रेशन कार्ड शिल्लक नाही, निवडणूक काम बंद आहे. अशा अनेक प्रकारची कारणे सांगून नागरिकांची समाज काढली जाते.
मनमाड शहरात बाहेर गावाहून व परराज्यातून आलेल्या लोकांना मात्र दहा दहा हजार रुपये घेऊन त्वरित तयार करून दिले जाते. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना नागरिकांना सदर सवलतीचा लाभ मिळत नाही. या अगोदर एक एप्रिल 2022 रोजी व 14 नोव्हेंबर 2022 रोजी लेखी तक्रारी निवेदन दिले आहे. मात्र या निवेदनाची काहीही एक दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोषण सुरू करण्यात आले होते.