यावल तालुक्यात दलीत वस्तीतीतील कामे निकृष्ट दर्जाची ? चौकशी करावी.अन्यथा आंदोलन, निळे निशाण सामाजिक संघटनेचा ईशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील डोंगर कठोरा (Dongar Kathora Taluka Yawal) ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या टक्केवारीच्या स्वार्थासाठी दलीत वस्तीतील नित्कृष्ट कामांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.[ads id="ads1"] 

 या संदर्भात अशोक तायडे यांनी समाज कल्याण विभाग अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,की यावल तालुक्यातील डोंगर कठोरा (Dongar Kathora Taluka Yawal)  या ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीमध्ये शासनाचे लाखो रूपये खर्च करीत काँक्रीट रस्ता व गटारी व आदी कामे करण्यात आली आहे. [ads id="ads2"] 

  ही सर्व कामे शासकीय निवेदनातील ठरवुन दिलेल्या निविदाप्रमाणे साहित्य न वापरता नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून दलीत वस्तीतील समाज बांधवांची आर्थिक स्वार्थाला बळी पडुन ठेकेदार व अधिकारी मंडळी दिशाभुल करणाऱ्या यावल पंचायत समिती मधील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच टक्केवारीच्या बळावर गुणवत्तापूर्ण काम न करता अत्यंत नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे तसे न झाल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्पाक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!