शहापूर येथे गणस्तरीय गाव विकास आराखडा प्रशिक्षण संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

 जळगाव जिल्हा परिषद जळगाव ग्रामविकास विभाग व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामविकास आराखडा सन 2023- 24 तयार करणे साठी एक दिवसीय प्रशिक्षण माध्यमिक विद्यालय शहापूर येथे संपन्न झाले प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत पाटील सामरोद सरपंच हे होते.[ads id="ads1"] 

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम शिंदे यांनी केले तसेच प्रवेक्षीय अधिकारी विकास वराडे यांनी पंधराव्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावातील सर्व विभाग एकत्र करून गावातील मुख्य गरजा ओळखून त्यांना प्राधान्यक्रम देऊन येणारे आर्थिक वर्ष 2023 24 साठी कृती आराखडा करण्यासंदर्भात सदर प्रशिक्षणात माहिती दिली.[ads id="ads2"] 

    यावेळी सरपंच चंद्रभागा दगडू सपकाळे राजनी, संजय मधुकर, रूपाली जितेंद्र पाटील, लिलाबाई दशरथ, आरती सुभाष कोळी तळेगाव, नीलकंठ वसंतराव पाटील, रीता पारधी, ग्रामसेवक एस बी गव्हारे राजनी, रवींद्र उमराव तायडे तळेगाव, श्रीकृष्ण भगवान पाटील, श्रीमती पी वाय पाटील, बी एन बारेले,गणेश भगीरथ पाटील, एम डी वरपे, विनायक भीवसन बिजागरे तसेच शहापूर तळेगाव शेळगाव सावरला आमखेडा टाकरखेडा समृद्ध जळांद्री शेवगे पिंपरी राजनी आधी गावातील सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा वर्कर मुख्याध्यापक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!