नांदगाव मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभा मंडपाचे भूमिपूजन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक (मुक्ताराम बागुल) नांदगाव तालुक्याचे आमदार श्वासांना कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (२५/१५) अंतर्गत नांदगाव मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावर सभापंड मंजूर करण्यात आलेली आहे. असावा मंडपाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शनिवारी नांदगाव तालुक्यातील जवळपास वीस आदिवासी वस्ती व बंजारा तांडा येथील सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.[ads id="ads1"] 

        आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम सुहास कांदे यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण प्रत्येक गावा गावात गावकऱ्यांनी केले. आदिवासी महिला माय भगिनी व बालगोपाळासोबत अंजुम सुहास कांदे यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जानवत होता. [ads id="ads2"] 

      नांदगाव तालुक्यात आदिवासी वस्ती व बंजारा तांडा असे एकूण दीडशे सभागृह देण्यात येणार असून या सभागृहांमध्ये वधू वर कक्ष तसेच भोजन कक्षाची व्यवस्था या सभागृहात असणार आहे. आमदार सुहास कांदे यांनी आदिवासी वस्तीवर तसेच बंजारा तांडा वस्तीवर सभागृह मंजूर केल्यानंतर त्वरित आपल्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य तसेच संत सेवालाल महाराज यांची भव्य आकर्षक मूर्ती भेट दिली आहे.

        समृद्धी प्रतिष्ठान सोहळा अतिशय थाटामाटा नांदगाव येथे सर्व समाज बांधवांची उपस्थितीत मागील महिन्यात साजरा केला होता. आता लवकरच ही सभा मंडप बांधून तयार होईल आणि पुन्हा एकदा त्या सर्व मूर्तींची स्थापना त्यात उसात करण्यात येणार आहे. तसेच उद्या रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी देखील सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!