रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील थोरगव्हाण ते सावदा रोडवर गुरांना वाहून नेणारा ट्रक जप्त करण्यात आला असून यातून ४० गोवंशाची मुक्तता करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास Raver तालुक्यातील थोरगव्हाण ते सावदा रोडवर फिल्टर हाऊसच्या (Filter House) पुढे MP ०४ GB ९२९१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुरांची कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार, कारवाई करून सदर ट्रक जप्त करून यातील चालकास अटक करण्यात आली.[ads id="ads2"]
या कारवाईमध्ये एकूण ४० गुरांची मुक्तता करण्यात आली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन(Savda Police Station) गुरन /२०२२, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) (ङ), (च), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५,९,११ महा. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, महा. मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम ८३ प्रमाणे मसून बेग मतलुब बेग ( रा. खेल वार्ड-११, कांधला रुरल, ता. किराणा, जिला-शामली राज्य उत्तर प्रदेश ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
या कारवाईत गुरे आणि ट्रक असा सुमारे १४ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि श्री पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश अशोक पाटील हे करत आहेत.



