छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ भुसावळ सह वरणगाव शहरात आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने राज्यात ठीक ठिकाणी यांच्या निषेधार्थ तीव्र रोष व्यक्त करीत आंदोलने होत आहेत. [ads id="ads1"] 

  आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील भुसावळ सह वरणगाव शहरात राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करीत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ भुसावळ सह वरणगाव शहरात आंदोलन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या पूर्वी देखिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.[ads id="ads2"] 

   त्याच्या निषेधार्थ अशा महाराष्ट्र द्रोही माणसाला आपल्या शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही म्हणुन त्यांना या पदावरून तत्काळ कार्यमुक्त करा अशी मागणी करण्यात आली देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांना असंख्य स्वाक्षऱ्या असलेले राज्यपालांच्या बद्दलचे निषेध पत्र पाठवण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ शिव- शाहु- फुले - आंबेडकर प्रेमी नागरिक सहभागी झाले.. राष्ट्रवादी वरणगाव शहर राष्ट्रवादी युवक वरणगांव शहर समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!