मुक्ताईनगर प्रतिनिधी- विनोद कोळी
माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू ,यांच्या 25 वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना यश मिळाले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,मा.एकनाथ शिंदे साहेब, यांनी अवघ्या तीन महिन्यात दिव्यांग बांधवांना वेगळं मंत्रालय बांधून देण्याची घोषणा केली. [ads id="ads2"]
मा.आ.बच्चू कडू यांच्या मागणी प्रमाणे ,महाराष्ट्रतील दीव्यांग बांधवांना वेगळं व्यासपीठ,न्याय, हक्य देणारे नेतृत्व मिळाले.त्याबद्दल बुंदी वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष उत्तम जुंबळे,सुरेश पाटील,विलास जुंबळे,रघुनाथ पाटील, भावराव भोगे, सालिक बेलदार,धोंडू कडू, आदी प्रहार संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.



