📘 जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे सत्यशोधक समाज संघाची जिल्हा बैठक संपन्न !.....
जळगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
जळगाव - दि. २७ नोव्हेंबर, २०२२ रविवार रोजी शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे सत्यशोधक समाज संघाची जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न झाली. या सभेचे प्रास्ताविक सत्यशोधक सुधाकर बडगुजर यांनी केले. प्रास्ताविकात बडगुजर यांनी सत्यशोधक समाजाच्या जिल्हा अधिवेशनाचा आढावा व नियोजन सांगितले.[ads id="ads1"]
सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा बैठकीचे अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील होते. इतिहासाचे गाढे अभ्यासक सत्यशोधक जयसिंगराव वाघ, मुकुंदराव सपकाळे यांनी सत्यशोधक समाज संघ जिल्हा अधिवेशन कार्यक्रम पत्रिकेचे उद्घाटन केले. उद्घाटनिय मनोगतात दोघेही मान्यवरांनी सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशन यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात व मान्यवरांसोबत उपाय - योजना संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. व स्वतः मुकुंदराव सपकाळे यांनी ११,००० रू. देणगी घोषित केली व या पाठोपाठ सर्व सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या इच्छेनुसार ५,००० / ३,००० / १,००० रू. देणगी दिली.[ads id="ads2"]
सत्यशोधक अरिवंद खैरनार, डॉ.सुरेश झाल्टे यांनी आपल्या मनोगतात आपली सभ्यता व आपली संस्कृती जोपासावी कुठल्याही धर्माचा विरोध न करता सत्यशोधक समाज संघाच्या प्रचार - प्रसार गावा-गावात झाला पाहिजे व शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांचा विचारांवर चालले पाहिजे, जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यात प्रचार प्रसार करून हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडूया असे प्रतिपादन केले व सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक जी.ए.उगले सर लिखित सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील चरित्र व कार्य या ग्रंथास रोहमारे पुरस्कार जाहीर उगले सरांचा अभिनंदन ठराव डॉ. झाल्टे यांनी मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार व नाशिक येथे सत्यशोधक परिषद यशस्वीरित्या पार पाडल्या व महाराष्ट्रात सत्यशोधक समाज संघ उत्साहाने काम करत आहे. आपली व्यवस्था - आपली विधीकर्ते आपण निर्माण केले पाहिजे. यासाठी धरणगावला महाराष्ट्रातील पहिले विधीकर्ते शिबिर घेण्यात आले होते. याच पद्धतीने कुऱ्हे पानाचे या गावाला होणारे दुसरे जिल्हा अधिवेशन सुद्धा यशस्वीरित्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडेल असे प्रतिपादन केले.
या जिल्हा बैठकीला कुऱ्हे पानाचे गावाचे सरपंच प्रमोद उंबरकर, आबासाहेब राजेंद्र वाघ, विजय लुल्हे सर, राजु जाधव, रमेश बोढरे, दिनेश महाजन, आनंद सपकाळे, कल्पेश पाटील, विजय चव्हाण, राजू जाधव, रतन साळुंखे, मधुकर सपकाळे, वाल्मीक सपकाळे, निलेश बोरा, रमेश वराडे, दिलीप सपकाळे, सुरेश सपकाळे, संजय वराडे, रवींद्र तितरे, कविराज पाटील, शिवदास महाजन, कैलास जाधव व सत्यशोधक विचारांचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील सर यांनी तर आभार प्रमोद उंबरकर यांनी मानले. जिल्हा बैठक यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


