रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद कोळी
प्रहार दिव्यांग अपंग क्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,तथा आमदार, बच्चुभाऊ कडू ,हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून दिव्यांगांच्या हक्कासाठी, आणि विकासासाठी, स्वतंत्र दिव्यंग मंत्रालय स्थापन करण्यात यावं ,अशी मागणी सातत्याने राज्य सरकारकडे, व विधानसभेत मांडत होते. [ads id="ads2"]
या मागणी मागणीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय ,श्री एकनाथजी शिंदे साहेब .यांनी मान्य करून ,येत्या 3 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त घोषणा करणार आहेत. त्या निमित्ताने राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी ठीक दुपारी बारा वाजता डॉबाबासाहेब आंबेडकर, चौक रावेर येथे, आम्ही प्रहार पक्षाचे सर्व दिव्यांग पदाधिकारी व कार्यकर्ते ढोल ताशे वाजवून तसेच बुंदीचे लाडू वाटपाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे.
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
तसेच माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू ,यांच्या आदेशाचे पालन सर्व जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष, यांच्याकडून करण्यात येत आहे. आणि आभार व्यक्त करण्यात येणार आहेत.



