ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात केळी उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपूर ता.रावेर (विनोद कोळी) ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात 'केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्राची' स्थापना करण्यात आली आहे. सदर केंद्रामार्फत दि २१/११/२०२२ सोमवारी सकाळी ९:०० वाजता केळी उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. [ads id="ads2"]  

  कार्यशाळेत प्रथम सत्रात प्रा. महेश महाजन, वरीष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,पाल हे केळी पिकातील रोग व्यवस्थापन या विषयावर , द्वितीय सत्रात प्रा डॉ धिरज नेहेते, शास्त्रज्ञ, कृषी उद्यान केंद्र,पाल हे केळी पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर तर तृतीय सत्रात श्री अमोल महाजन , मुख्य कार्यकारी अधिकारी,सिनारियो एग्रो, जळगाव हे केळी निर्यात या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.[ads id="ads1"]  

  चतुर्थ सत्रात शेतकऱ्यांची खुली चर्चा व कार्यशाळेचा समारोप आयोजित करण्यात आला आहे. कार्यशाळेचे अध्यक्ष श्री भागवत पाटील, अध्यक्ष, ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम पाटील, चेअरमन, रामदास महाजन , उपाध्यक्ष, संजय पाटील, सेक्रेटरी, ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर हे राहणार आहेत. सदर कार्यशाळेचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ जे बी अंजने व समन्वयक डॉ एस ए पाटील यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!