रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद कोळी
सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील निंबोल ,ऐनपूर परिसरात परमिट नसताना रेती, आणि मातीची वाहतूक जोरात चालू आहे. नियमानुसार शासनाने महसूल विभागाने रेती, आणि मातीच्या वाहतुकीला परमिट असेल तर रेती आणि माती ची वाहतूक करू शकतात असे स्पष्टपणे सांगितले आहे. [ads id="ads1"]
पण, याउलट विना परमिटची रेती आणि मातीची वाहतूक जोरात चालू आहे .याला कारणीभूत तलाठी ,आणि सर्कल , सर्कल आणि तलाठी परस्पर तोडी पाणी करून मार्ग काढत आहेत, "महसूल विभागाने "विशेष दंड, आकारलेला आहेत. त्याला न जुमानता तलाठी ,आणि सर्कल निम्म्यावर तोडी पाणी करीत आहेत.[ads id="ads2"]
याला जबाबदार (तलाठी , सर्कल की प्रशासन) असा सवाल? लोकांमध्ये निर्माण झालेला आहे .म्हणून सर्कल आणि तलाठी यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी लोकांकडून अपेक्षा मागणी होत आहे .लवकरात लवकर जर का कार्यवाही झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुद्धा करण्यात येईल, असे मत व्यक्त होत आहे.