दि.१८ डिसेंबर रोजी ग्राम पंचायतीसाठी ६७ केंद्रावर ७७.५९ टक्के मतदान झाले. १८ ग्राम पंचायती साठी १८ हजार ९६६ पैकी १२ हजार ६७४ पुरुष तर १७ हजार ३९२ पैकी १३ हजार ९७१ महिला असे एकुण ३६ हजार ३५८ पैकी २६ हजार ६४५ (७७.५९%) मतदारांनी मतदान झाले होते. [ads id="ads2"]
आज सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयातील मध्यवर्ती ठिकाणी पोर्च मध्ये ही मतमोजणी होईल . दरम्यान काल निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी कर्मचार्यांना तहसीलदार उषाराणी देवगुणे व अधिकार्यांनी प्राशिक्षण दिले .
९ टेबलावर सात फेर्यांमध्ये मत मोजणी होईल . प्रत्येक टेबलावर निवडणूक निर्णय अधिकारी व दोन कर्मचारी असे २७ कर्मचारी व २५ कर्मचारी राखीव असतील . प्रथम १६ लोक नियुक्त सरपंच व नंतर ९९ सदस्यांच्या निवडीसाठी मनमोजणी होईल . दूपारी बारा वाजे पर्यन्त सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे . तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयुर कळसे ,श्री लोलपे यांनी नियोजन केले आहे.
तसेच कोणाच्या अंगावर विजयी गुलाल पडणार? व कोणाचा पराभव होणार ? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



