रावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ८१ तर ग्रा. प. सदस्यपदासाठी ४४६ असे एकूण ५२७ अर्ज दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)रावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ८१ तर सदस्यपदासाठी ४४६ असे एकूण ५२७ अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी ४४ व सदस्यपदासाठी २८१ असे एकूण ३२५ अर्ज काल दिनांक 2 डिसेंबर अखेर दाखल झाले. चार ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे. [ads id="ads1"] 
  यात निंभोरासीम, कोचूर खुर्द येथे अनुसूचित जमाती राखीव तर अटवाडे व धुरखेडा येथे अनुसूचित जमाती महिला राखीव. तर सिंगत ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.[ads id="ads2"] 

 दरम्यान,  महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी किरण सावंत, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार मयुर कळसे यांनी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी पाहणी केली. 

सरपंच व सदस्यपदासाठी (कंसात ) मावनिहाय दाखल झालेले एकूण अर्ज असे : 

थोरगव्हाण २ (३३), अजंदे ३ (२०), जानोरी ४ (१२), वाघोदा बुद्रूक ७ (४६), निंभोरासीम १ (१६), खिरोदा प्र. यावल १३ (५३), अटवाडे १(९), कांडवेल ५ (१८), कोचुर खुर्द १ (१९), बलवाडी ४ (१३), सुनोदा ६ (१८), कुंभारखेडा ५ (२३), सावखेडा बुद्रूक ३ (२३), सावखेडा खुर्द ५ (१४), गाते ५ (२९), सिंगत ० (९), नेहेते ४ (३१), नांदुरखेडा २ (६), दोधे ४(५), धुरखेडा १ (११), खिरवड २ (२६), भाटखेडा ३ (१२) असे सरपंचपदासाठी ८१ व सदस्यपदासाठी ४४६ एकूण ५२७ दाखल झाले आहेत.अश्या प्रकारे रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!