रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील कोचूर (Kochur Taluka Raver) येथे 2 जून 2013 या दिवशी विनोद ज्ञानेश्वर शिंदे वय - 28 याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात योगेश केशवसिंग परदेशी व प्रदीप ब्रिजलाल पाटील या दोघंही संशयीतांवर खूनाचा आरोप होता. हा खटला येथील जिल्हा सत्र न्यायालयात (Jilha Satra Nyayalaya) चालला. परीस्थितीजन्य पुराव्याअभावी दोन्ही संशयीतांची खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.[ads id="ads1"]
सबळ पुराव्या अभावी दोघांची झाली निर्दोष मुक्तता
विनोद शिंदे याला टॉमीने मारले अशी फिर्याद विनोदचे मामा विलास कराड यांनी पोलिस ठाण्यात दिली होती.त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हा खटला अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात(Jilha Satra Nyayalaya) चालला. [ads id="ads2"]
यामध्ये १० साक्षीदार यांची याचे जबाब नोंदविण्यात आले. परीस्थितीजन्य पुरावा सिध्द न झाल्याने दोघंही संशयीतांना अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने(Jilha Satra Nyayalaya) निर्दोष मुक्त केले. संशयीतांतर्फे अॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी काम पाहीले. त्यांना अॅड.संजय वानखेडे, व अॅड.जया झोरे यांनी न्यायालयीन काम काजासाठी सहकार्य केले.
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : रावेर शौचालय घोटाल्यातील आरोपींनी जमा केले 10 लाख रुपये, तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांची माहिती
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास १० डिसेंबरला रावेर येथे राष्ट्रवादीतर्फे रास्तारोको आंदोलन निवेदनाद्वारे दिला ईशारा
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : रावेर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदासाठी 37 व सदस्य पदासाठी 165 अर्ज दाखल



