मनमाड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनमाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक ( मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्याने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज दिनांक 10 डिसेंबर2022 रोजी शनिवारी पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन मनमाड व मंडळ अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

          याबाबत सविस्तर पैठण येथे आयोजित कार्यक्रमात जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करून व शांततेचा भंग होईल या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी भीक मागून शाळा उघडल्या असे बेताल वक्तव्य खुद्द उच्च व तंत्रज्ञान शिक्षण शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असून हा समस्त महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. अशा मंत्र्याची महाराष्ट्राला गरज नाही. नाहीतर युवा पिढी देशोधडीला लागेल. त्यामुळे असा शिक्षण मंत्री त्वरित हटविण्यात यावा व सदर मंत्र्यांने केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे नोंदविण्यात आला आहे.[ads id="ads2"] 

        कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला म्हणून सदर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन चिडली जाईल तरी याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस ठाणे व मंडळ अधिकारी मनमाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

            सदरच्या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, कैलास अहिरे नांदगाव तालुकाध्यक्ष, दिलीप नरवडे युवक तालुकाध्यक्ष, गुरकुमार निकाळे तालुका युवक अध्यक्ष, एडवोकेट प्रमोद अहिरे शहर सचिव, बाळासाहेब खरे, सुनील बागुल, बबलू घोडके, चांगदेव संसारे, पंकज तायडे, मनी उबाळे, आकाश वाघमारे, दिनकर कांबळे, धनंजय अवचारे, तसेच महिला आघाडीच्या कमल खरात

मंदाताई भोसले, कुसुम दहिवले, मीनाताई गांगुर्डे, जिजाबाई जाधव, अरुण जाधव, आधी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!