यावल तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू तस्करी जोरात प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


वाळू तस्कर म्हणतात तलाठी सर्कल पोलिस हप्ते घेतात.

यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यात ट्रॅक्टर,डंपर व काही ट्राला इत्यादी वाहनांच्या माध्यमातून वाळू तस्करी जोरात सुरू आहे,ट्रॅक्टर आणि डंपर चालक व मालक यांच्याकडून महसूल व पोलीस विभागाकडून मासिक हप्ते गोळा केले जात असल्याचा आरोप यावल तालुक्यातून वाळू व्यवसायिकांकडून होत आहे.[ads id="ads1"] 

          यावल तहसील कार्यालया पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरावल,टाकरखेडा, भालशिव,अंजाळे शिवारातून तापी नदी व इतर नदी नाल्यातून अवैध वाळू वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे यासोबत अंजाळे शिवारातून तापी नदी पात्रालगत डबर, मुरूम उत्खननाचा परवाना पेक्षा जास्त उत्खनन करून सर्रासपणे गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे याकडे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष केंद्रित करून ठोस निर्णय घेऊन तात्काळ कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.[ads id="ads2"] 

       यावल तालुक्यात अंदाजे 50 ते 60 ट्रॅक्टर ट्रॉली तसेच 20 ते 25 डंपर व काही ट्राला ईत्यादी वाहनांच्या माध्यमातून अवैध वाळू तसेच डबर मुरूम इत्यादीची अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे.याकडे संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे का? तलाठी सर्कल आणि पोलीस यांच्या नावावर दर महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते कोण गोळा करतो याबाबत सुद्धा चर्चेला उधाण आले आहे. यावल शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक शासकीय स्तरावर विविध बांधकामे सुरू आहेत त्या ठिकाणी वाळू मुरूम माती येथे कुठून हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून तालुक्यात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असताना तसेच महसूल आणि पोलीस यांची रात्रीची गस्त सुरू असताना अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहने दिसून येत नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी महसूल व पोलीस यांचे संयुक्त गस्तीपथक नियुक्त करून कारवाई करून अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!