बालरोगतज्ज्ञ डॉ.धीरज पाटील यांनी शाळेत आरोग्य तपासणी केली मोफत.....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगांव - ग्रामसुधारणा मंडळ साळवे संचलित, प.पू.साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय, साळवे येथील बालवाडी ते पाचवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी धरणगाव येथील आराधना हाँस्पिटलचे संचालक डॉ धीरज पाटील यांनी औषधे मोफत उपलब्ध करून दिली व पालकांना सल्ला व मार्गदर्शन केले.    [ads id="ads2"]  

              याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे यांनी आरोग्य चांगले रहावे यासाठी खान - पान व व्यायामाची आवश्यकता याचे महत्व पटवून दिले. खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे यांनी आभार मानले. यावेळी एस पी तायडे, ए वाय शिंगाणे, प्राथमिक च्या शिक्षिका श्रीमती वर्षा नेहेते, सारीका नेहेते,कांचन अत्तरदे व अनिता अहिरे यांनी सहकार्य केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!