यावल नगरपालिकेत अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी कचराकुंडीत...? कारवाई मात्र शून्य

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  (सुरेश पाटील) यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात 90% ठिकाणी रस्त्यावर व सर्व प्रभागात ठिकठिकाणी सर्रासपणे अनधिकृत अतिक्रमण आणि बिना परवाना बांधकाम सुरू आहे याबाबत अनेक तक्रारी यावल नगरपालिकेत लेखी स्वरुपात आहेत त्याचप्रमाणे रामा बडगुजर यांनी अतिक्रमणाबाबत तक्रार केली आहे,कार्यवाही न झाल्याने ती तक्रार यावल नगरपालिकेने कचराकुंडी टाकल्याचे तक्रारदारांत,यावल शहरात बोलले जात आहे. [ads id="ads1"]  

      यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी यावल शहरातील सार्वजनिक वाचनालया जवळील प्रकाश लक्ष्मण चौधरी,शिवदास भिकाजी गडे यांना यावल नगरपरिषद हद्दीतील सि.सर्वे नंबर 207 मधील अतिक्रमणाबाबतच्या विषयांन्वे लेखी पत्र दिले त्यात म्हटले आहे की आपल्या मालकीचे सिटी सर्वे नंबर 207 च्या पूर्वेकडील भागात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून कंपाउंड वॉल व जिन्याचे बांधकाम केलेले आहे असे व संदर्भीय अर्जात नमूद तक्रारी अर्जानुसार तक्रार प्राप्त झालेली आहे सदर तक्रारी अर्जानुसार तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेल्या सि.सर्वेच्या नकाशानुसार प्रथमदर्शनी असे निदर्शनास येते की आपण केलेले जिना व कंपाउंड वॉलचे बांधकाम अतिक्रमण केलेले दिसत आहे. [ads id="ads2"]  

         तरी आपणास सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की सदर जागा आपली मालकीची असल्याबाबत आपल्याकडे कागदपत्रे काही पुरावे असतील तर ते यावल न.पाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात सादर करावे किंवा याबाबत आपले काही लेखी म्हणणे असल्यास तसा लेखी खुलासा देखील त्यासोबत सादर करावा अन्यथा सदर अतिक्रमण काढणे बाबत पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

          अतिक्रमणाबाबत जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत पुढील नवीन कोणतेही बांधकाम यावल न.पा.ची रीतसर परवानगी शिवाय बांधकाम करू नये अन्यथाआपले विरुद्ध न.पा.अधिनियमानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी असे यावल नगरपालिकेने अतिक्रमण धारकास लेखी कळविले आहे.

          यानंतर यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दि.13/12/ 2022 रोजी पुन्हा अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन त्यात म्हटले आहे की यावल नगर परिषदेचे अभियंता,रचना सहाय्यक व कनिष्ठ अभियंता यांनी संयुक्तरित्या स्थळ निरीक्षण केले असता आपण आपल्या मालकीचे सिटी सर्वे नंबर 260, 262 समोर सार्वजनिक रस्त्यावर आपण पक्के कंपाऊंड भिंतीचे व गॅलरीचे बांधकाम करून अतिक्रमण केलेले दिसत आहे. सदर अतिक्रमण बाबत आपले काही एक म्हणणे असेल किंवा त्यासाठी काही कागदपत्रे पुरावे असेल तर सात दिवसाच्या आत नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे किंवा याबाबत आपल्याकडे आपल्या मालकीचे जागेचा सिटीसर्वेच्या नकाशा वरून आपल्या स्तरावर जागेची मोजणी करून सार्वजनिक रस्त्यावर केलेले पक्के कंपाऊंड भिंतीचे गॅलरीचे बांधकाम अतिक्रमण 30 दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावे व सार्वजनिक रस्ता मोकळा करून रहदारीला येणारी अडचण दूर करावी व नगरपरिषदेला सहकार्य करावे अन्यथा आपल्या विरुद्ध नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 179 व 189 मधील तरतुदी व एमआरटीपी अॅक्ट 1966 चे कलम 52,53, 54 नुसार पुढील कार्यवाही करणे भाग पडेल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार आपण राहाल याची नोंद घ्यावी असे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण धारकास कळविले आहे यानंतर पंधरा दिवस उलटल्यावर सुद्धा कारवाई शून्य असल्याने अतिक्रमणाबाबतची तक्रार यावल नगरपालिकेने कचराकुंडी टाकली आहे का याबाबत व इतर अतिक्रमणाबाबत यावल शहरात जोरदार चर्चा सुरू असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!