जागतिक अपंग दिवस तसेच दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय निमित्त मुंबई विद्यापीठ येथे स्वागत समारोह संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विशेष प्रतिनिधी (विनोद कोळी)

  दिनांक 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस तसेच दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय निमित्त मुंबई विद्यापीठ येथे स्वागत समारोह संपन्न

   जागतिक अपंग दिवस म्हणून 3 डिसेंबर या रोजी मुंबई विद्यापीठ सीएसटी या ठिकाणी मोठी सभा घेण्यात आली तसेच दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय यासाठी माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या 25 वर्षाच्या अथक प्रयत्नाला अखेर यश आले.[ads id="ads1"] 

     माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत सभेत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली.[ads id="ads2"] 

त्यानंतर बच्चुभाऊ यांनी दिव्यांग संदर्भात आपले विचार मांडले.प्रथम सर्व दिव्यांग बांधवांना सर्व ठिकाणी मानसन्मान देण्यात यावा तसेच शासनाच्या जीआर नुसार दिव्यांग बांधवांना त्वरित 5% निधी देण्यात यावा त्यांना घरपट्टी यात 50 टक्के सूट मिळावी तसेच ग्रामपंचायत ने दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फुट जागा देण्यात यावी तसेच अपंग जोडप्यांना विवाहासाठी लागणारी मदत त्वरित द्यावी असे सक्तीचे आदेश ग्रामसेवक आणि (B D o)यांना देण्यात आले. तसेच दिव्यांग ही जात एकच असून सर्वांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे सभेत सूचित केले बच्चु भाऊंनी आपले विचार मुंबई विद्यापीठ येथील सभेत चांगल्या प्रकारे मांडले.

   त्यानंतर बच्चुभाऊंनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांनी सुद्धा बच्चू भाऊ यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्या ठिकाणी उपस्थित मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार माननीय चंद्रकांत पाटील प्रहार संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी प्रहार दिव्यांग अपंग क्रांतीचे जळगाव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील जिल्हा सल्लागार राजमल दादा वाघ जिल्हा संघटक राजेश खडके जिल्हा सचिव धर्मराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष शकील दादा पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव जिल्हा सिविल रुग्णसेवक हरीश कुमावत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी मुक्ताईनगर दिव्यांग तालुकाध्यक्ष उत्तम जुम्बळे यावल दिव्यांग तालुकाध्यक्ष किरण कोळी हेमराज चौधरी रावेर तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्ष जितेंद्र कोळी शाखा संघटक विश्वनाथ भिल्ल कार्याध्यक्ष दिनेश सैमिरे मुक्ताईनगर दिव्यांग उपाध्यक्ष सुरेश गवते खजिनदार धोंडू पाटील शाखाध्यक्ष सिताराम पाटील इत्यादीपदाधिकारी उपस्थीत होते.

दिव्यांग मंत्रालय समारंभ आ. बच्चू कडू यांचे मनोगत..

दिव्यांग मंत्रालय समारंभ आ. बच्चू कडू यांचे मनोगत..

Posted by Bacchu Kadu on Sunday, December 4, 2022

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!