प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे सुलवाडी ग्रामपंचायत येथे जागतिक अपंग दिवस साजरा तसेच विविध विषयांवर चर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी

अपंगांचे कैवारी माननीय माजी राज्यमंत्री ,बच्चू भाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ,अनिल भाऊ चौधरी .यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे जिल्हाध्यक्ष माननीय, बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने आज दिनांक 23 /12 2022 रोजी सुलवाडी ,तालुका रावेर येथील ग्रामपंचायत मध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला.  [ads id="ads1"]  

  प्रथम दिव्यांग बांधवांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष, विनोद कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना ते बोलले दिव्यांग बांधवांच्या 2016 च्या जीआर नुसार जवळ जवळपास 44 योजना ,आहेत." त्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ परिपूर्ण घेता येत नाही, त्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांग बांधवांसाठी परिपूर्ण त्यांच्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल ,असे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांनी सुलवाडी येथील दिव्यांग बांधवांना सांगितले. [ads id="ads2"]  

   तसेच रावेर तालुक्यातील बरीचशी ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांना अजून पर्यंत 5 टक्के निधी दिलेला नाही .त्याचा लाभ लवकरच त्यांना मिळवून देऊ. तसेच सुलवाडी येथील दिव्यांग बांधवांना 2016 च्या जीआर नुसार आजपर्यंत पाच टक्के निधी मिळाला नाही. असे सुलवाडी येथील ग्रामसेवक किरण पाटील, यांना सुचित करण्यात आले. त्यानंतर सुलवाडी येथील ग्रामसेवक किरण पाटील यांनी सांगितले की ,सुरवाडी येथील दिव्यांग बांधवांना आम्ही लवकरच 5% निधी वितरित करू त्यानंतर पंधरावे वित्त आयोगातून सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी सार्वजनिक वाचनालय उभारण्याचे प्रयत्न करू असे सांगितले .त्याबद्दल प्रहार जनशक्ती चे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष ,सुरेश चिंधू पाटील यांनी ग्रामसेवक यांचे आभार व्यक्त केले .

हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

आणि दिव्यांग बांधवांसाठी आपले चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केले .तसेच माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ यांच्या पंचवीस वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्रात प्रथम स्वतंत्र दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाचे उद्घाटन 3 डिसेंबर या रोजी मुंबई विद्यापीठ येथे करण्यात आले. भारतातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की बच्चुभाऊंच्या अथक प्रयत्नामुळे दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार झाले .त्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांचे स्वागत प्रहार दिव्यांग संघटना क्रांतीच्या वतीने सुलवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले .तसेच तसेच स्वतंत्र दिवस दिव्यांग मंत्रालयाचे मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा आभार मानले. तसेच सुलवाडी गावातील सरपंच ज्योतीताई कोळी ,उपसरपंच सोपान पाटील ,ग्रामसेवक किरण चौधरी ,यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या .तसेच सुलवाडी येथील सरपंच ज्योतीताई कोळी यांनी दिव्यांग बांधवांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सरपंच ज्योतीताई यांना शुभेच्छा दिल्या.च तेथे उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष, विनोद कोळी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष, सुरेश पाटील .प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत, पाटील प्रहार दिव्यांग तालुका संघटक आनंदा कोळी, प्रहार दिव्यांग शाखाप्रमुख गोपाल कोळी समाजसेवक मनू भाऊ कोळी, शाखा उपाध्यक्ष प्रमोद महाजन तसेच सुरवाडी गावातील दिव्यांग महिला व पुरुष भरपूर प्रमाणात उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!