रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर गृप ग्रामपंचायत तामसवाडी बोरखेडा ता.रावेर यासोबतच रावेर तालुक्यातील गोर गरीब जनता घरकुल पात्र लाभार्थीना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न. दरम्यान पात्र लाभार्थ्यांकडून पंडित दीनदयाळ ऊपाद्ध्याय घरकुल योजनेंतर्गत शासकीय जमीन मुल्यविरहित उपलब्ध करून देणे अथवा आहे त्याच ठिकाणी अतिक्रमण केलेल्या जागांवर घरकुलाचा लाभ मिळणे बाबत विनंती अर्ज दाखल यापूर्वीच दाखल केलेला आहे. [ads id="ads1"]
तामसवाडी ता.रावेर दिनांक ३० डिसेंबर २०२२ प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत ड यादीत नाव समाविष्ट असून व घरकुलासाठी पात्र असून देखील स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे या पात्र लाभार्थ्याना जागा उपलब्ध करून देण्या विषयी नोटीसा बजावून त्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आला दरम्यान नोटीसा बजावलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून पंडित दीनदयाळ ऊपाद्ध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत शासकीय जमीन मुल्यविरहित उपलब्ध करून देण्यात याव्यात अथवा ते अतिक्रमण करून निवास करित असलेल्या ठिकाणीच घरकुलाचा लाभ मिळणे कामी गृप ग्रामपंचायत कार्यालय तामसवाडी बोरखेडा ता.रावेर येथे विनंती अर्ज दाखल केला आहे [ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र शासन व राज्य शासनाने सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतलेली असतांनाच तामसवाडी ता.रावेर येथील ड यादीत समाविष्ट पत्र लाभार्थी केवळ जागे अभावी अद्यापपर्यंत घरकुलापासून वंचित आहेत. तसेच दिनांक २९/१२/२०२२ रोजी तामसवाडी ता.रावेर येथील ड यादीत समाविष्ट पात्र लाभार्थी नामे अनुक्रमे १) राजेश वसंत रायमळे आणि २)प्रतिभा जुम्मा तडवी या पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालया मार्फत प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत नोटीसा बजावून ड यादीत समाविष्ट असलेल्या व घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्याना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सदर लाभार्थी सामाजिक,आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबातील असून कुटूंब विस्तारामुळे निवासासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे ते बर्याच वर्षांपासून गावालगतच असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवास करित आहेत. वेळोव्ळी निघालेल्या शासकीय परिपत्रकांचा संदर्भ देऊन व ग्रामसेत सहभाग घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात अतिक्रमण नियमाकूल करण्यात येऊन घरकुलांचा लाभ मिळणे कामी सामुहिक अर्ज विनंत्या केलेल्या आहेत,मात्र ग्रामपंचायत च्या उदासीनतेमुळे निराशाच पदरात पडली.त्यातच या नोटीशी बजावण्यात आल्यानंतर सदर लाभार्थी तसेच ड यादीत समाविष्ट एकूण सर्वच लाभार्थ्याना घरकुलापासून वंचित राहतात की,काय अशी काळजी वाटू लागली आहे.
दरम्यान नोटीसा बजावण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून केंद्र व राज्य शासनाकडून सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबाना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतल्याचा संदर्भ देऊन पंडित दीनदयाळ ऊपाद्ध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत शासकीय जमीनी मुल्यविरहित उपलब्ध करून देण्यात याव्यात अथवा आहेत त्या ठिकाणीच म्हणजेच बऱ्याच वर्षांपासून जेथे अतिक्रमण करून निवास करित आहेत त्याच ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात यावेत अशा आशयाचे विनंती अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सुपूर्द करण्यात आलेले असून त्यांच्या प्रती महाशय तहसिलदार रावेर आणि महाशय गटविकास अधकारी पंचायत समिती रावेर यांचेकडेस माहीतीस्तव रवाना करण्यात आलेल्या आहेत.



