रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शौचालय घोटाळ्यात अजून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाई मुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता या शौचालय घोटाळामध्ये आतापर्यंत एकुण ३३ संशयित आरोपी अटकेत आहेत.[ads id="ads1"]
रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) शौचालय घोटाळ्यात सखोल चौकशी करून अटकसत्र सुरू आहे. भ्रष्टाचार प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात रावेर तालुक्यातील अजून ९ जणांना वेगवेगळ्या गावांमधून रावेर पोलीसांनी(Raver Police) अटक केली आहे. [ads id="ads2"]
यामध्ये बाळु कोळी (रणगाव),भूषण पाटील (धामोडी),गोकुळ करवले (अटवाडे), युवराज बोदडे (निंभोरा),ललित सोनार (निंभोरा), विश्वनाथ कोळी (रायपुर), प्रवीण इंगळे (रावेर), गोकुळ रुले (मस्कावद सिम), आणि रविंद्र पाटील (मोरगाव) अशा नऊ जणांना रावेर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकुण ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शौचालय घोटाळा प्रकरणात अजून छोट्या सहित, मोठ मोठे मासे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







