ऐनपूर (विनोद हरी कोळी) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभागा अंतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री व्ही एस नाईक महाविद्यालय, रावेर येथील प्रा एस बी धनले यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतातील सर्व नागरिकांना वैचारिक,शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,आर्थिक स्वातंत्र्य दिले म्हणूनच आपण आज या पदावर आहोत असे सांगितले. तसेच आजच्या या अभिवादन सभेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन भारत देशाची राज्यघटना लिहीली असे त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले. [ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही.एन. रामटेके यांनी केले. तसेच या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. के.जी. कोल्हे यांनी मानले व अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


