ऐनपूर (विनोद हरी कोळी): येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे एड्स जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. [ads id="ads1"]
या सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले. डॉ. डी. बी. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात भारतीय समजाला एड्स मुक्त करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. या रोगाविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. [ads id="ads2"]
तसेच तो होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी याविषयी सखोल माहिती दिली. मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय भाषणात एड्स जनजागृती करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच तरुणांनी खास करून एड्स मुक्ती साठी विशेष खर्दारी घ्यावी असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.


