3 महीने गाळ वाहतूक साठी 20 ट्रॅक्टर चालकांकडून 25 हजाराची वर्गणी चर्चेचा विषय
यावल दि.19(सुरेश पाटील) यावल मंडळात गाळ वाहतुकीची अधिकृत परवानगी नसताना गेल्या पंधरा दिवसापासून यावल मंडळात गाळ,वाळू गौण खनिज सर्रास वाहतूक सुरू झाली आहे, 3 महीने गाळ वाहतूक करणेसाठी 20 ट्रॅक्टर चालकांकडून 25 हजाराची वर्गणी बिना पावतीने चलन न फाडता एका अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गोळा झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात गाळ व अवैध गौण खनिज खनिज वाहतूकदारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. [ads id="ads1"]
यावल मंडळात यावल तहसील कार्यालयापासून सात ते नऊ किलोमीटर अंतरावरून म्हणजे भालशिव,पिपरी,वाघुळद इत्यादी तापी नदी पात्र परिसरातून गाळ वाहतूक 15 ते 20 ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून रात्रंदिवस बिनधास्तपणे सुरू आहे.शासन निर्णयानुसार गाळ व वाळु वाहतुकीचा परवाना मिळत नसल्याने पंधरा ते वीस ट्रॅक्टर चालकांकडून तीन महिन्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये लाच घेऊन गाळ वाहतुकीचा तोंडी परवाना दिल्याचे गाळ वाहतूकदारांमध्येच बोलले जात आहे. [ads id="ads2"]
गाळ वाहतूकदारांकडून प्रत्येकी 25000 रुपयाची वर्गणी घेणारा तो कोण? याबाबत सुद्धा महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर ; 'या' तारखेपासून होणार मैदानी चाचणी
महसूल विभागातील संबंधिताने वर्गणी घेतली नसेल तर सर्रासपणे गाळ वाहतूक कोणत्या नियमानुसार सुरू आहे, आणि याकडे संबंधितांचे दुर्लक्ष का होत आहे?यासोबत यावल मंडळात अवैधरित्या वाळू,डबर, मुरूम, इत्यादी गौण खनिजाची सर्रासपणे रात्रंदिवस खुलेआम वाहतूक सुरू असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे,प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी तातडीने कडक कारवाई करून अवैध गौण खनिज वाहतूक बंद करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.



