जळगाव जिल्हा प्रतिनिधी(हमिद तडवी) रावेर तालुक्यातील मौजे कुसुंबा खुर्द येथे होर्टसॅप अंतर्गत केळी पिकाची ची शेती शाळा निमित्ताने शिवार फेरी पण घेण्यात आली व शिवार फेरीला खूप प्रतिसाद मिडाला तसेच शेतकऱ्यांचे बांधावर सर्व प्रॉब्लेम समजून त्यांना उपाय योजना सांगण्यात आल्या सदर शेती शाळेला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश महाजन सर तसेच अतुल पाटील वरिष्ठ शास्त्रज्ञ गावचे कृषी सहाय्यक संदीप बारेला उपस्थित होते.[ads id="ads2"]
या शेती शाळेत केळी पिकाला थंडीपासून बचावासाठी संरक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात आले माननीय महेश महाजन सर यांनी केळी पिकाचे थंडीपासून संरक्षणासाठी वेळीच उपाय योजना कराव्या त्यामुळे केळी करपा व्यवस्थापन होईल तसेच शिवार फेरीमध्ये अतुल पाटील व महेश महाजन सर यांनी हरभरा पिक निरीक्षणे करून हरभरा घाटेअळी व्यवस्थापनकरण्यासाठी 5% निंबोळी अर्क तसेच काम गंध सापडे यांचा वापर करावा या उपाययोजना सांगितल्या तसेच तुर पिकाचेही योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील उपसरपंच मुकेश पाटील सर तसेच व प्रगतिशील शेतकरी उपस्तीत होते.



