पैठण येथे आयोजित कार्यक्रमात जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होईल व शांततेचा भंग होईल या हेतूने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी भीक मागून शाळा असे बेताल वक्तव्य खुद्द उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावे हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे. असे वक्तव्य करून आपली अल्पबुधदी किती आहे समस्त महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.[ads id="ads2"]
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली . असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणारे फक्तव्य भारतीय जनता पार्टीचे वाचाळ चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद, भारतीय बौद्ध महासभा, शिवसेना शिंदे गट, व सर्व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार गोष्ट माझी करत नांदगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.



