राज्यस्तरीय साहित्य संमेलनास हजर राहण्याचे जयसिंग वाघ यांचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आम्बेडकरी साहित्य अकादमी बुलडाणा तर्फे दिनांक २४ व २५ डिसेम्बर २०२२ रोजी गर्दे वाचनालय , बुलडाणा येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. [ads id="ads1"]  

      या दोन दिवसीय संमेलनात संविधान रैली , मानवंदना , उदघाटन सत्र , प्रकट मुलाखत , चर्चा सत्र , सांस्कृतिक कार्यक्रम , काव्यजागर , दोन गझल मुशायरा , पाच परिसंवाद व समारोप सत्र असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. [ads id="ads2"]  

   या साहित्य संमेलनात २४ रोजी दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत " भारतीय संविधानास अभिप्रेत भारत " या विषयावर आयोजित परिसंवाद मध्ये जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांच्या अध्यक्षते खाली डॉ शमशुद्दीन तांबोळी पुणे , भरत यादव सोलापुर , डॉ सिमा मेश्राम अमरावती व डॉ सतीश म्हस्के हे आपले विचार मांडनार आहेत .

      या संमेलनास राज्यभरातून २५५ साहित्यिक , विचारवंत , कवी  , कलाकार सहभागBी होणार आहेत तेंव्हा अधिकाधिक साहित्यिक व साहित्यप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयसिंग वाघ , डॉ विजयलक्ष्मी वानखेड़े , सुरेश साबळे रमेश सरकटे यांनी केले आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!