
पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा दिला इशारा [ads id="ads1"]
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २७/१२/२०२२ रोजी यावल येथील महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणासोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग म्हणून सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या गुंडांनी थेट भालोद ता.यावल जि.जळगाव येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला. जवळपास ६०/७० गुंडानी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली. [ads id="ads2"]
यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी, लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभे केले जाईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जळगांव जिल्हाउपाध्यक्ष प्रेमभाई तायडे, रावेर युवा तालुका अध्यक्ष जितूभाऊ इंगळे व राष्ट्रीय पॅन्थर आघाडी जिल्हाध्यक्ष अजयभाऊ शेलार यांनी दिला आहे. त्या वेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे मोहन ससाणे, धनराज ससाणे, अजय तायडे, राहुल शिरतुरे, अक्षय शिरतुरे, अजय अवसरमल, शुभम महाजन, प्रदीप अवसरमल, जीवन अवसरमल, पवन तायडे, शरद भालेराव, अजय मेढे, सचिन अवसरमल, सचिन शिरतुरे, स्वप्नील अवसरमल, सागर मशाने, गोविंदा इंगळे, आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.



